दत्तप्रबोधिनी न्यास द्वारे राबवल्या जाणाऱ्या श्री स्वामी समर्थ उपासना मार्गात आध्यात्मिक ऊबंटु सामुहीक नामस्मरण सोबतच आता दर आठवड्याला गुरुवारी रात्री ११ वाजता सामुहीक पारायणाचेही नियोजन सद्गुरुकृपे निर्धारित केले आहे.
दर आठवड्याला होणाऱ्या सामुहीक पारायण पाठात गोरक्ष किमयागिरी प्रवाह ग्रंथाचा विनियोग होणार आहे. यात साधकाने ग्रंथात दिलेल्या शब्द ब्रम्हातुन शुद्ध ब्रम्हाकडे आत्मपरायण कराव अशी अपेक्षा सद्गुरु महाराजांना आहे याची कृपया सविस्तार साधकाने समज घ्यावी.
नवनाथीय पारायण पाठाचा साधनाक्रम खालीलप्रमाणे क्रमप्राप्त आहे.
- १. श्री काळभैरव नामस्मरण १ माळ
- २. श्री स्वामी समर्थ नामस्मरण १ माळ
- ३. शिव गोरक्ष नामस्मरण १ माळ
- ४. गोरक्ष किमयागिरी प्रवाह ग्रंथ पाठ
- ५. श्री दत्त नामस्मरण व सद्गुरु चरणी सेवा समर्पण.
इतर माहिती Live येऊन त्यावेळी थोडक्यात दिली जाईल.
पारायण उपासानेहेतु खालीलप्रमाणे तयारी करावी.
- १. जप माळ ( रुद्राक्ष )
- २. बैठकीसाठी ऊनी वस्त्राचे
- ३. ग्रंथ पुस्तक किंवा PDF वापरा.
- ४. पाण्याने भरलेली वाटी.
- ५. भस्म / ऊदी / विभुती
PDF साठी खालीलप्रमाणे दिलेल्या फोटोवर क्लीक करुन Download करा.
महत्त्वाची सुचना -
ज्यांना साप्ताहीक सामुहिक पारायणात सहभागी होण्याची ईच्छ्या आहे त्यांसाठी नोंदणी हेतु खालीलप्रमाणे
या विषयाला अनुसरुन संबंधित पोस्टस् पहा.
0 Comments