Facebook

दत्तगुरु नामानुभव आणि कृपा आशीर्वाद - ह. भ. प. दत्तात्रेय रघुनाथ मोरे


II ओम नमो भगवते दत्तात्रेयाय II
II हरी ओम तत्सत जय गुरुदत्त II

श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सद्गुरू नमः 
(श्री गणेश चिंतन केल्याने आकलन शक्ती वाढते, देवी सरस्वतीचं चिंतन केल्याने आपल्या जिभेवर ती सदैव कृपा करते त्यामुळे आपल्याला विषय समाजविण्याची शक्ती मिळते आणि गुरुचं चिंतन केल्याने अनुभव प्राप्त होतो.) 


दत्तगुरु नामानुभव आणि कृपा आशीर्वाद


लहान असताना माझे वडिल ( आप्पा- कै.रघुनाथ ) आणि आई ( विद्या) मला दत्त दरबारामधे घेवुन जायचे. आई म्हणायची दत्त दरबारामधील शिंदे महाराज यांच्या आशिर्वादाने माझे नाव दत्तात्रेय ठेवले आहे. कळत नकळत माझ्या समोर दत्त नाम समोर येत होत. दिवसभर दत्त दरबारात दत्त नाम भजन चालू असे. 


दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरादिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

दत्त भजन नाम  संपूर्ण  आकाशात दुमदुमायचा पण आता तसा अनुभव येत नाही.

घरी माझे वडिल (आप्पा) दररोज सकाळी उठून पूजा करायचे. शंख वाजण्याचा आवाज आला कि समजायचं कि आता पूजा संपणार. खूप लहान होतो तेव्हा एवढ समजत नव्हतं पण आता त्या आठवणी खूप छान वाटतात.

माझे नाव दत्तात्रेय माझ्या शाळेचे नाव श्री स्वामी समर्थ हाय स्कूल, लहान असताना राहण्याचे ठिकाण दत्त टेकडी जोगेश्वरी आणि आता स्वतःचा घर ते पण गुरुदत्तनगर आणि स्वामी समर्थनगर विरार येथे. दत्त मार्गावर लहान लहानपणापासूनच मला दत्त गुरूंनी जोडून घेतलं होत.

खरा आनंद हा श्वासो श्वासे दत्त नाम घेण्यातच आहे. हे दत्त गुरु मला क्षणोक्षणी जाणवून देत होते. पण कलीयुगात हे आत्मबोध होण्यासाठी मला वयाच्या ४० वर्षी लागली.

माझे वय ३० असताना मी गुरुचरित्र पारायण आणि स्वामी चरित्र सारामृत वाचन चालू केल होत. एके दिवशी मी निद्रेत असताना मला भगवान दत्तात्रेय आणि सद्गुरू स्वामी समर्थ यांचे दर्शन झाले. भगवान दत्तात्रेय स्मितहास्य देऊन माझ्याकडे बघत होते आणि सद्गुरू स्वामी समर्थ  माझ्यावर गुरुकृपाशिर्वाद देत होते. सद्गुरू स्वामींनी मला अतिशय महत्वाचं काही सांगितलं आणि म्हणाले बाळा लक्षात राहील ना ?  मी हो म्हटलं. त्यांनी पुन्हा एकदा ओरडून सांगितलं आणि म्हणाले लक्षात राहील ना ?? मी हो म्हटलं असं तीन वेळा मला महाराजांनी गुरुकृपा आशीवाद दिला. माझी अचानक निद्रावस्था सुटली आणि मी उठून बसलो.

मी स्वामींना नमस्कार केला आणि  स्वामींनी जे काही सांगितलं त्या गुरुवाक्यावर  चिंतन करत राहिलो पण अर्थ काही उमगत नव्हता.  मी श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण जमेल त्याप्रमाणे चालू ठेवलं होत आणि त्यांनी सांगितलेल्या उपदेशाचा सतत चिंतन करत राहायचो. 

ऑगस्ट २०१९ ला माझ्या कुटूंबावर वर अचानक मोठं संकट आलं माझा लहान भाऊ( कै. परिमल) आम्हाला सोडून गेला. त्याच  स्मॉल ब्रेन डॅमेज झालं होत. जेव्हा त्याला ब्रेन स्ट्रोक आला तेव्हा मला त्याच्या पत्नी ने फ़ोन केला लगेच मी टॅक्सी करून हॉस्पिटल ला आलो. त्याला वाचवण्याचा मी अतोनात प्रयत्न्य केला पण माझे सारे प्रयत्न निष्फळ ठरले. भरपूर डॉक्टरना कॉन्टॅक्ट केला काही उपयोग नाही झालं . स्वामींना विनवणी केली. सर्व प्रयत्न करत होतो नंतर विचार केला कि आता आपण काही करू शकत नाही २४ तासात त्याने प्राण सोडला. त्याच्यावर माझे अतोनात प्रेम होते. लहानपनापासून त्याची खूप काळजी घ्यायचो. त्याच्या जड देहाने मला खूप काही शिकवलं. आपला नश्वर देह त्याला सुखी करण्यासाठी आपण खूप विषय आनंद घेत असतो. पण त्याचा उद्धार करण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाही. त्यावेळेस मला अनुभव आला गुरु दत्तात्रेयांनी आपल्या देहाला २५ वा गुरु मानलं होत. २३ दिवसांनी माझी मोठी बहीण((कै. सुगंधा) पण आम्हाला सोडून गेली. ती आजारी होती आणि प्रकृती सुधारत नव्हती. तिला कावीळ झाली होती. 

एक दिवस तिच्या साठी स्वामी मठामध्ये बसून राहिलो आणि स्वामींना विनवणी केली तिला वाचवा. तासंतास बसलो होतो. खूप दुःखात होतो. तीही मला सोडून गेली. खूप विचारात होतो एकामागोमाग एक लहान भाऊ आणि मोठी बहीण मला सोडून गेली होती. अध्यात्म  मध्ये जास्त गुंतून राहायचा मार्ग धरला. स्वामी नाम चालूच होते. भरपूर जणांनी मला मार्गदर्शन केला. डॉ. पुसाळकर सर म्हणाले नामस्मरण सोडू नको हे भोग आहेत तुझे आणि तुझ्या कुटुंबातील भोग तू स्वीकार कर .मी हो म्हटलं. गुरुवर्य ह.भ.प. नलावडे महाराज यांनी मला मानसिक आधार दिला. 

प. पु. वासुदेवानंद सरस्वती यांचे कृपा आशीर्वाद असलेले कुलदीप सर यांनीही कृपाशीर्वाद दिला. दत्त नामस्मरण कसे करावे याचा मार्गदर्शन पर उपदेश दिला. त्याप्रमाणे नित्य अध्यात्मिक कर्म चालू ठेवलं. ते म्हणाले पदोपदी तुला छान अनुभव येईल. 
भगवान दत्तात्रेय यांच्या कृपेने दोन वेळा गिरनार वारी झालं. प्रत्यक्ष अनुभुती आली. गुरूं माझी आर्ततेची हाक ऐकत आहे अस अनुभव आला आणि अजूनही येत आहे. पदोपदी ते माझ्या पाठीशी आहे अशी जाणीव होत आहे. श्वासो श्वासें दत्त नाम घेण्याचा संकल्प केला आहे आणि नामस्मरण चालू आहे. 
३० वर्षाचा असताना जो भगवान दत्तात्रेय स्वामीकृपेनं स्वप्न आशीर्वाद झालं होत. ते ब्रम्ह वाक्य आणि त्याचा गर्भितार्थ याचं मी एकाग्रतेने चिंतन करत होतो .अर्थात त्याचा मतितार्थ समजला. मनापासून  सतत दत्त नामस्मरण चिंतन केल्यामुळे अनुभव आलं.जशे च्या तसे शब्द आणि त्यांचा आध्यत्मिक अर्थ मला दत्त चिंतनात मिळाले. दत्तांनी २४ गुरु केले आणि त्याचा बोध झाला आणि त्यातून आलेला अनुभव माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. 

गुरु कसा असावा आणि त्यांच्याकडून जे अतिदुर्लभ ज्ञान प्राप्त झाले खरंच त्यामुळे मी अगदी   धन्य झालो. नामात गुंतल्यामुळे असा अनुभव आला कि पूर्व जन्म मी अगोदरच जीवन मुक्त्त झालो आहे आणि आता मोक्ष साधनच्या वाट धरली आहे.भौतिक सुख आणि आध्यत्मिक सुख यातील नश्वर आणि शाश्वत नक्की काय आहे ,याचा आत्मबोध झाला. महावाक्य तत्त्वमसी ( ते तू आहेस) याचा बोध झाला. गुरु कृपेने गुरु शिखर गिरनार वारी दोन वेळा पूर्ण झाली. गुरुकृपेने गिरनार दुसऱ्या वारीला हरी आणि दत्त यांच्यातील द्वैत समजावलं. हीच खरी अनुभुती आली .* हरी ओम तत्सत जय गुरुदत्त हा मूलमंत्र आणि महामंत्र मिळाला.

भगवान दत्तात्रेयांची कृपा अशीच राहूदे आणि नाम साधनेत सतत आणि एकाग्र चित्त राहूदे अशी श्री दत्तांकडे  एकच मागणे आहे. वरील गुरु वाक्य अनुभव आणि कृपा आशीर्वाद अनुभव सद्गुरू चरणी ठेवत आहे. 

हरी ओम तत्सत जय गुरु दत्त

  • ह. भ. प. दत्तात्रेय रघुनाथ मोरे 
  • विरार 9823730085

विषयाला अनुरुप महत्वपुर्ण पोस्टस्...Post a Comment

0 Comments