Facebook

गिरनार परिक्रमा अनुभव श्री दत्त दर्शन ओम नमो भगवते दत्तात्रेयाय


दत्त नामस्मरण साधना सुरु केली आणि दत्त महाराज यांना भेटण्याची ओढ लागली होती.
 

ऑफिस मध्ये काही मित्रांनी विषय काढला कि दत्त महाराजांनी तपश्चर्या करून सिद्ध केलेलं स्थान म्हणजे गिरनार. गिरनार परिक्रमा करून  दत्त पादुका दर्शन  घेणे हे खूप पुण्याचं आहे.

मनात हूर हूर लागली कि गिरनार परिक्रमा करणे आणि दत्त महाराजांचं दर्शन घेणे. गिरनार परिक्रमा जाण्याची तारीख ठरवली २२-२४ डिसेंबर २०१९ . काही मित्र सोबत येण्यासाठी तयार झाले. अचानक मित्रांना काही महत्वाचं काम आल्याने मला तिकिट्स कॅन्सल करावे लागले. पण मनात हूर हूर लागली होती कि दत्त महाराज यांचे दर्शन घेणे आणि ठरवलं कि एकट्याने परिक्रमा करावी. नेटवर एक लेख वाचला होता कि शक्यतो एकट्याने परिक्रमा करू नये सोबत कुणीतरी असावे. माझी पत्नी स्वप्ना ने हि मला विनंती केली कि जमेल का तुम्हाला परिक्रमा करणे कारण खूप कठीण आहे.मनात विचार आला कि सद्गुरू दत्त महाराज स्वतः सोबत असताना कसली भीती. माझे वय ४० आणि मला उजव्या पायाला घुडघे दुकींचा त्रास आहे. पण मनात निश्चय १०० % केला होता कि काहीही असो आपण परिक्रमा करायची. सद्गुरूंचा आशीर्वाद सोबत असताना कसली चिंता करायची  गरज नाही.

नवीन वर्षाची सुरवात गिरनार ला जाऊन करावी असं ठरवलं आणि लगेच २ जानेवारी  २०२० ची बस तिकीट बुक केली. सद्गुरू श्री स्वामी समर्थ आणि श्री दत्त प्रभूंचा मला स्वप्न आशीर्वाद असल्याने सद्गुरुंच्या  इच्छेनेच कदाचित हि परिक्रमा माज्याकडून होत आहे असा दृढ विश्वास  झाला.

सोबत दत्त महाराजांसाठी हिना अत्तर ,गंध , कापूर , भगवा वस्त्र , अगरबत्त्या , तीळ तेल , सुखा प्रसाद ड्राय फ्रुटस घेतलं.

माज्या सोबत थोडे कपडे,  नीकॅप घुडघे दुखी साठी,  इलेक्ट्रॉन energy पावडर,  चादर , स्वेटर घेतल. प्रथमच पत्नी ने बॅग पॅक करायला मदत केली आणि सांगितलं जास्त हुशार्या मारू नका त्रास झालं कि आराम करा काळजी घ्या. मनातल्या मनात छान वाटलं कारण तिला काळजी वाटली म्हणून ती बोलली.

रात्री ९:३० pm ची बस होती विरार highway वरून. मी रात्री ८:४५ pm ला पोचलो तेव्हा Private  ट्रॅव्हल Person ला फोन केला त्याने सांगितलं बस १:३० तास उशीरा आहे. काहीहि  पूर्व कल्पना नसल्यामुळे लगेच GOIBIBO ला फोन केला कारण तिकीट online बुक केली होती. त्यांनी सांगितलं सर बस late आहे ट्रॅव्हल कंपनी पैसे रिटर्न करायला रेडी आहे. माझा विचार १०० % पक्का  होता काही असो आपण गिरनार परिक्रमेला जायचा आणि मी थांबायला रेडी झालो.  रात्री खूप थंडी होती आणि विरार highway वर सोबतीला कोणीही नव्हता. थंडीनी गारठून गेलो होतो. बस खूप late आली मध्यरात्री १:१० am झाले बस यायला.  बस आल्यावर मनातील हूर हूर संपली आणि लगेच प्रवास सुरु केला. बस मध्ये स्वच्छता नव्हती आणि मेन्टेनन्स प्रॉब्लेम पण होता पण मनात ध्यास लागला होता सद्गुरूंना भेटायचा आणि त्या साठी काहीही सोचायाला तयार होतो.
 

दुपारी ३:४५ ला जुन्हागढ गुजरात ला पोचलो . पुढे ऑटो ने जावे लागते गिरनार तळेती पर्यंत १०० rs घेतात डायरेक्ट तळेती पर्यंत.  मी फ्रेश होऊन सरळ परिक्रमा करावी असं ठरवलं. एक काठी घेतली चालताना मदत मिळावी यासाठी, काठी ३० rs  मिळते परिक्रमा पूर्ण झाल्यावर २० rs परत करतात .

पायथ्याशी मारुतीचा मंदिर आहे मी तिथे नतमस्तक झालो आणि मारुतीला मी विनंती केली. मारुतीचा मला स्वप्न आशीर्वाद असल्यामुळे मला मारुतीवर पूर्ण विश्वास होता कि पूर्ण शक्ती मिळेल परिक्रमा पूर्ण होण्यासाठी. दत्त प्रभुना विनंती केली मला घेऊन चला .पहिल्या पायरीला नमस्कार केला आणि ओम नमो भगवते दत्तात्रेयाय असं नाम घेत  पुढे चालू लागलो.

 प्रत्त्येक पायरीवर दुर्गुणांचा त्याग करायचा असतो मी तास विचार करत ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नाम घेत चालू लागलो. काही पायऱ्या चढल्यानंतर कालभैरव देवाचं दर्शन घेतल. समोरून दोन मराठीत बोलत येताना परिक्रमा प्रवासी भेटलं ते पुण्याचे होते त्यांना त्यांचा अनुभव विचारलं. त्यांचा अनुभव छान होता त्यांनी सकाळी १० ला परिक्रमा सुरु केली होती. त्यांनी मला विचारलं तुम्ही एकटेच आहात का मी हो म्हटलं. त्यांनी मला विश्वास दिला तुम्हा जावा काही प्रॉब्लेम नाही पण रात्रीचा प्रवास आहे बॅटरी आहे का मी म्हटलं नाही आहे. माज्या लक्षात होत पण मी घ्यायला विसरलो. मी घेतो म्हटलं. त्यांनी सावकाश जावं असं सांगितलं तितक्यात अंगावर गार पाण्याचे थेंब पडले मी विचार केला अचानक पाऊस कसा आला तितक्यात वर झाडावर बसलेले मारुती दिसले. समजूम गेलो कि मारुती पाठीशी आहेत त्यांनी आशीर्वाद दिला आहे आणि परिक्रमेला काही त्रास होणार नाही. पुणेकर व्यक्ती पण हसले आणि विश्वास दाखवला. ह्या पुणेकर माऊलींनी मला बॅटरी घ्या असं महत्वाचा सल्ला दिला तो माज्यासाठी पुढे खूप उपयोगाचा ठरला.

कासवांसारखी  एक एक पावलं टाकत मनात ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नाम पुढे चालू लागलो. लगेच पुढे बॅटरी घेतली ३० rs . बॅटरी एक वेळ वापरण्यापुरती असते दुकान वाल्याने सांगितलं जेव्हा अंधार असेल तेव्हाच चालू करा मी हो म्हटलं. दुकान वाल्याने विश्वास दिला कि माझा मोबाइल नंबर घ्या काही अडचण आली कि फोन करा .त्याने हिंदी मध्ये म्हटलं कि " कूच तक्लीफ हो तो कॉल करना  हम मराठी लोगो के सेवा के लिये तय्यार होते हैं " विश्वास अजून वाढला. पदोपदी सेवे साठी माऊली उभी असते हे जाणवलं.

पुढे काही पावलं चालल्यावर एक दिल्ली चा कपल भेटलं त्यांच्या बरोबर सवांद झाला. मी परिक्रमा ठरवून सुरु केली होती पण त्यांची परिक्रमा कळत नकळत झाली होती. त्यांना दत्त प्रभू बद्दल काहीच माहिती नव्हती ते फक्त्त फिरायला आले होते आणि माज्या सद्गुरूंनी त्यांची परिक्रमा करून घेतली. मी त्यांना परिक्रमेचा आणि दत्त प्रभूंच्या दर्शनच महत्व सांगितलं. त्याना हि ते ऐकायला खूप आवडलं. त्यांनी मला विश्वास दिला कि जाताना काठीचा आवाज करत जावा कारण काळोख होत आहे आणि त्यांनी एक सापाचं पिल्लू पाहिलं होत. मी त्यांना हो म्हटलं आणि पुढे चालू लागलो.

पुढे छोटे छोटे मंदिर व देव देवींचे दर्शन करत आणि ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नाम घेतल पावलं टाकत राहिलो.एक स्वान येऊन पायाला चिकटून भेट देऊन गेला. दत्त प्रभूंचा अनुभव पदो पदी छान येत होता.
संध्याकाळ ची वेळ झाली होती आणि वरील निसर्ग खूप छान होता. थंड वारा सुटला होता. थोडा वेळ उभा राहिलो ज्या मित्रांनी मला गिरनार परिक्रमा बद्दल सांगितलं त्यांचे आभार मानले. सगळं काही छान छान वाटत होत.
 

काळोख व्हायला सुरु झालं होत माज्या बरोबर एक  कुटुंब चालत होत आता. बहुतेक ते देवीच्या दर्शनासाठी जात होते. ते पुढे गेले मी सावकाश एक एक पावलं टाकत ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नाम घेत जात होते.

पुढे नेमिनाथ यांचा जैन मंदिर लागलं. काळोख झाला होता म्हणून बाहेरून दर्शन घेत चालू लागलो. पुढे देवीच्या दर्शनाला गेलेला कुटुंब परत येताना भेटला ते म्हणाले सर लवकर जावा मंदिर बहुतेक बंद केलं आता तुम्हाला जेवायला मिळणार नाही. मी हो म्हटलं आणि चालू लागलो. वर देवीच्या मंदिरात गेलो तेव्हा मंदिर बंद झालं होत. मी विचार केला परत येताना देवीचा दर्शन घेऊया. भूक लागली नव्हती कारण भूक होती ती फक्त्त परिक्रमा पूर्ण करायची. मी पुढे चालू लागलो.

खूप अंधार झाला होता संध्याकाळचे ७.४५ pm झाले असावे. थोडा थांबलो देवीच्या मंदिराजवळ कारण पुढे light नव्हती अंधार होता. मी समजून गेलो आता बरोबर कुणीही नसणार आणि अंधार हि खूप असेल.४००० ते ५००० पायऱ्या बाकी होत्या विचार केला आयुष्याच्या शेवटी जेव्हा हा मनुष्यरूपी  देह सोडीन तेव्हा आत्म्याला म्हणजे पुरुषाला एकट्याने प्रवास करायचा आहे. मी पुढे प्रवास करायचा ठरवलं. बॅग मध्ये energy पावडर आणली होती ती पाण्यात टाकली आणि पियालो. जरा तर तरी आली. मी Tshirt आणि थ्रीफोरथ वर प्रवास सुरु केला होता म्हणून आडोश्याला जाऊन थंडीचे कपडे घातले स्वेटर , कानटोपी , जीन्स आणि रुमाल लावला तोंडाला. देवीच्या मंदिराजवळ एका माऊलीने सांगितलं सर तुम्ही पुढे गोरक्षनाथ यांचा पर्वत उतरल्यावर डाव्याबाजूला दत्त प्रभूंचा मंदिर आणि उजव्याबाजूला आश्रम आहे तुम्ही उजव्याबाजूला  जावा कारण आता हवा खूप आहे मंदिर बंद असेल तुम्हाला तिथे जेवायला आणि आराम करायला मिळेल. मी हा म्हटलं आणि पुढे चालू लागलो.

कासवांसारखी हळू हळू पावलं टाकत मनात ओम नमो भगवते दत्तात्रेयाला पावलो पावली नाम घेत चालू लागलो. काही दिसत नसल्या मुले बॅटरी चालू केली होती.  देवीच्या मंदिरापासून पुढे काही पायऱ्या उत्तरंन आहे नंतर गोरक्षनाथ मंदिराकडे जाण्यासाठी उभ्या सरळ पायऱ्या आहेत. वर गोरक्षनाथ पर्वतावर पोचलो तिचे घंटा होती गुंफे जवळ ती वाजवली नतमस्तक होऊन नमस्कार केला आणि पुढे चालू लागलो . पुढे खूप पायऱ्या उत्तरंन आहेत दत्त प्रभूंच्या आणि कमंडलू स्थान च्या Gate पर्यंत. पुढे दर्शन घेत दत्त प्रभू मंदिर आणि कमंडलू स्थान Gate जवळ पोचलो.

देवीच्या मंदिराजवळ माऊलीने सांगितल्याप्रमाणे प्रथम कमंडलू स्थान वर जाण्याचे ठरवले. कमंडलू स्थान हे उत्तरंन वर आहे आणि दत्त प्रभूंचा स्थान उंच टोकावर आहे. कमंडलू आश्रम जवळ आलो. तिथे आंत जाता  येत नव्हते कारण बाहेरून कुलूप होते. देवीच्या मंदिराजवळ एका माऊलींनी सांगितलं होत कि आश्रमाजवळ तुम्हाला मदत मिळेल म्हणून बाहेरून आत आवाज दिला कोणी आहे का गुरुजी. तीन वेळा आवाज दिला तेव्हा वर मंदिरातील गुरुजी बाहेर आले. ते हिंदी मध्ये म्हणाले Gate बंद होणे के बाद इसे नही खोलते अभि सुभय ४ बाजे खोलेंगे. मी त्यांना request केली त्यांनी मला वर देवीच्या मंदिरात जायला सांगितलं. मी म्हणालो गुरुजी खूप लांब आहे मंदिर . त्यांनी मला शेवटी Gate बाहेर जवळ बसायला सांगितलं. मला खूप बर वाटलं आणि त्यांना धन्यवाद म्हटलं. त्यांनी मला विचारलं आपने चादर लाया हे ना. मी हा म्हटलं. रात्रीचे ९:४५ pm झाले होते आणि पूर्ण रात्र बाहेर पर्वतावर काढायची होती. मनात फक्त्त ध्यास हित दत्त सद्गुरुंच्या दर्शनाचा आणि काही झाल तरी चालेल. सद्गुरू पाठीशी आहेत काही होणार नाही. खाली बसलो.

बॅग मध्ये थोडा स्नॅक बरोबर आणला होता ते खाल्लं. नामस्मरण करत बसलो होतो. रात्री ११.३० ला परत गुरुजी बाहेर आले त्यांनी मला झोपायला सांगितलं. मी पुन्हा एकदा त्यांना विनंती केली गुरुजी आत येता  येईल का कारण थंडीने मी गारठलो होतो आणि पूर्ण शरीर हलत होत थंडीने. मंदिरातील गुरुजींनी वर टोकावर दत्त प्रभूंकडे बघितलं आणि मला सांगितलं हर एक मनुष्य कर्म होता हैं पाप पुण्य होता हैं आपको बाहर हि सोना पडेगा. मी विचार केला कि हि माझी परीक्षा आहे. मी गुरुजींना चालेल म्हटलं. मी त्यांना एक प्रश्न केला गुरुजी आप कबसे इधर हो, मी हा प्रश्न त्यांना विचारायला नको होता तरीही त्यांनी मला उत्तर दिला. हम तो साधू हैं कभी इधर तो कभी और जगह पर. गुरुजी नंतर आत गेले जाताना मला माझा सामान मोबाईल बॅग पॉकेट सांभाळून ठेवायला सांगितलं.

मी एकच  चादर आणली होती कशी बशी अड्जस्ट करून झोपायाचा प्रयत्न केला. थोडी झोप लागली पण थंडी खूप होती पाठ धरायला लागली परत उठून बसलो कारण परतीचा प्रवास पण करायचा होता पाठ धरली तर प्रॉब्लेम होईल म्हणून बसून अखंड नामस्मरण करूया असा विचार केला. रात्री थंडी खूप वाढली होती अंगावरची चादर ग्लोव्हस सर्व गारव्याने भिजले होते. दोन्ही डोळ्यात अश्रू आले होते आणि विचार करत होतो  खरंच मी खूप वाईट असेंन म्हणून मला सद्गुरूंनी बाहेर बसवलं असेल. पण माझे  सद्गुरू खुप प्रेमळ आहेत जे काही करतात ते चांगल्यासाठीच करतात. मी प्रायश्चित आहे असा समजून बसलो होतो.

अचानक खूप हवा आली आणि हवेचा वेग पण खूप होता माज्यासाठी हा अनुभव खूप मोठा होता. रात्रीचे १२.३० झाले होते थोड्या वेळानी परत खूप हवा आली आणि हवेचा वेगहि जोरात होता. सकाळ चे २ वाजले होते नामस्मरण चालूच होत. वर गोरक्षनाथ पर्वत light दिसू लागली. काही परिक्रमा प्रवासी येत होते आणि पूर्ण पर्वतावर श्री गुरुदेव दत्त असं आवाज होत होता .खूप छान छान वाटत होत. सकाळी ३.१५ दरम्यान एक परिक्रमा ग्रुप कमंडलू आश्रम जवळ आला. माज्याशी त्यांनी संवाद केला तेही मराठी होते पुण्याचे.

सकाळी ४:१५ ला कमंडलू आश्रम मधून गुरुजी बाहेर आले आणि दत्त प्रभूंचा मंदिराजवळ चला असा सांगितलं. मी आणि पुणे ग्रुप त्यांच्या मागे चालू लागले. मनात छान वाटू लागलं आता मला लवकरच सद्गुरूंचा दर्शन होणार. मी पावलं टाकत ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नाम घेत चालू लागलो. पर्वतावर दर्शनासाठी सिंगल लेन लावावी लागते. आत गाभाऱ्यात गेलो सोबत दत्त महाराजांसाठी आणलेलं पूजेचं सामान हिना अत्तर , गंध , कापूर , भगवा वस्त्र , अगरबत्त्या , तीळ तेल , सुखा प्रसाद ड्राय फ्रुटस  गुरुंजी जवळ दिल. दत्त महाराजांचं दर्शन झालं. पावलाच दर्शन आणि सुंदर दत्त महाराजांचं मूर्तीच दर्शन घेतलं खाली उतरावं असं वाटतच नव्हतं. गाभाऱ्यातील इतर वस्तूंकडे लक्ष जात होत अचानक जाणवलं मी इथे अगोदर येऊन गेलो आहे. काही वस्तू आणि आतील जागा हि परिचयाची आहे. डोळ्यात अश्रू येत होते कारण माज्या साठी हि माझी पहिली परिक्रमा नव्हती. मी या आधी हि परिक्रमा केली होती हे जाणवत होत.  दत्त गुरूंनी मला दिलेल्या या अनुभवाचे स्मरण करत होतो आणि आभार मनात होतो. अनुभवाचे हे क्षण माझ्यासाठी खूप मोलाचे होते.

दत्त गुरूंना विनंती केली कि जन्मो जन्मी अशीच सेवा होऊदे. मी या आधी कधीहि  एकट्याने कुठे गेलो नव्हतो घाबरायचो जायला . एवढी शक्ती मला दत्त गुरुनि  दिली आणि गुढगे दुखीचा त्रास असूनसुद्धा किंचित हि गुढघे दुखी जाणवलं नाही. 


                II जन्मोजन्मी सद्गुरू असता पाठीशी तर भय कशाला जन्म मरणाची II

सकाळी ४:४५ ते ५:१५ दर्शन झालं खूप छान छान वाटत होतो. उतरताना कमंडलू दर्शन घेतलं धुनी दर्शन घेतलं. आश्रमातील गुरुजींनी सांगितलं परिक्रमा रात्री १२ नंतर पहिली पायरी चालू करा म्हणजे परिक्रमा सुलभ होईल.

परतीच्या प्रवास माझ्यासाठी नवीन नव्हता कारण सद्गुणच्या आशीर्वादाने मला पूर्व परिक्रमा अनुभव आला होता. परतीच्या वेळी वाटेत मला दिगंबर साधू दिसले, काही सिद्ध पुरुषांचे स्थान बघितलं हा अनुभव  माझ्यासाठी पूर्वानुभव होता. माझ्या पहिल्या परिक्रमेमध्ये मला पुर्वानुभव झाला होता.

पूर्वानुभव आल्यामुळे मी मनात विचार केला कि पूर्व परिक्रम अगोदर केली  असल्यामुळे मला एकट्याने प्रवास करायला भीती जाणवली नाही.

परतीचा प्रवास सोपा आहे करत फक्त्त कारण गोरक्ष नाथ पर्वत पायऱ्या चढणे आहे शिल्लक सर्व पायऱ्या हे उत्तरंन आहे. परत येताना एक फॉरेन चा कपल भेटलं त्यांना दत्त महाराजा बद्दल सांगितलं. असही जाणवलं कि सद्गुरू कळत नकळत पुण्यवान मनुष्याकडून परिक्रमा करून घेतात छान वाटलं श्री गुरुदेव दत्त.

सोबत Kneepad  घेतल्यामुळे त्रास जाणवलं नाही उतरताना. सकाळी १०:१५ ला तळेती ला पोचलो.
 

मारुती ला प्रणाम केला कारण परिक्रमा पूर्ण करण्यासाठी मला शक्ती दिली. दत्त महाराजांना नमस्कार केला शेवटच्या पायरीवर विनंती केली कि माज्यावर अशीच आपली छाया राहूदे.
 

सद्गुरूची  सर्व भक्तांवर अशीच छाया राहूदे श्री गुरुदेव दत्त.

माझा अनुभव सद्गुरू चरणी ठेवत आहे.
II श्री गुरुदेव दत्त II

  • दत्तात्रेय रघुनाथ मोरे 
  • विरार. 9823730085

विषयाला अनुरुप महत्वपुर्ण पोस्टस्...Post a Comment

0 Comments